तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी येवल्यात काढली धिंड
तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी येवल्यात काढली धिंड
img
दैनिक भ्रमर
येवला (दिपक सोनवणे) :- काल सायंकाळच्या सुमारास येवला शहर पोलिसांच्या वतीने येवला शहरात दाखल असलेल्या तरुणीच्या अत्याचार प्रकरणी तीन आरोपींची पोलिसांनी मेन रोड विंचूर चौफुली परिसरात धिंड काढली.

फोटोग्राफीचा व्यवसाय करणारा अरिफ खान, वसीम सय्यद व राज सय्यद अशी या आरोपींची नावे असून तिघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून येवला शहरातील विंचूर चौफुली येथे तपास कामासाठी व विविध हॉटेल्स वर देखील पोलिसांनी तपास कामांसाठी आरोपींना नेऊन तपास केला आहे.

त्याप्रसंगी विंचूर चौफुलीवर आरोपींना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अधिक तपास येवला शहराचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group