येवला तालुका पोलिसांकडून हातभट्टीची दारू जप्त
येवला तालुका पोलिसांकडून हातभट्टीची दारू जप्त
img
दैनिक भ्रमर

येवला (दीपक सोनवणे) :- राज्य शासनाने प्रतिबंधित केलेली तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेली हातभट्टीची दारू अंदरसुल परिसरामध्ये विकली जात असल्याची माहिती येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना गुप्त खबऱ्या द्वारे मिळाली होती.

त्यानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अंदरसुल परिसरामध्ये सापळा रचून  सिद्धेश संजय भांगरे (रा. अंदरसुल) याला शेजारील नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून वीस लिटरच्या जार मध्ये मोटरसायकलवर ही गावठी हातभट्टीची दारू अंदरसुल परिसरात विक्री साठी आणत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस नाईक हेंबाडे, पोलीस शिपाई आबा पिसाळ, गणेश बागुल, सागर बनकर सचिन बनकर परिश्रम घेतले. येवला तालुका पोलिसात संशयित विरोधात भादंवि कलम 328 मुंबई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत 65  ई 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group