येवल्यात मनसेचे खड्ड्यांमधील पाण्यात जलपूजन करून अनोखे आंदोलन
येवल्यात मनसेचे खड्ड्यांमधील पाण्यात जलपूजन करून अनोखे आंदोलन
img
दैनिक भ्रमर


येवला : येवले शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवले नगरपरिषदेला दिनांक १२ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने आज शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये येवले परिषदेचा निषेध म्हणून विविध ठिकाणच्या या गल्ली तलावांचे गांधीगिरी पद्धतीने अनोखे असे आंदोलन म्हणून जल पूजन करून निषेध नोंदविण्यात आला. 

शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत अस्वच्छ पाणी मिळत असल्याने अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच रस्त्यात साचलेल्या पाण्याने  सर्दी,खोकला, हिवताप, चिकनगुनिया डेंगू यांसारख्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात येवले शहरात दिसून येत आहे नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता नगरपरिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा असताना नगरपरिषद सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन करून नागरिकांच्या मनातील रोष व्यक्त केला आहे तसेच नगरपरिषदेने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल न घेतल्यास नगर परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पटेल, तालुकाध्यक्ष नकुल घागरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, धीरज सिंग परदेशी, शहरसंघटक शैलेश कर्पे, महेश लासुरे, प्रवीण खैरनार, अक्षय पंडोरे, दीपक काथवटे, गणेश लुळेकर, अल्ताफ शेख, आशिष अंकाईकर, सलीम मोमीन, निलेश साताळकर, सागर बाबर, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते
इतर बातम्या
Join Whatsapp Group