शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदाराचे मुंबईत निधन
शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदाराचे मुंबईत निधन
img
DB
राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे, शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते. शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. 

अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍या तिकीटावर ते विजयी झाले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ही विजयी झाले होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते.

मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार , सुना नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group