हेमंत गोडसे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन
हेमंत गोडसे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन
img
दैनिक भ्रमर
नाशिकच्या जागेसाठी महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांचे नाव नाशिकमधून जाहीर केले होते. त्यानंतर अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहे. गोडसे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 

यावेळी शिवसैनिकांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी आपल्याला एवढच सांगतो की, तुम्ही खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठिशी उभे राहा. कोणताही अन्याय होणार नाही. तुम्ही काळजी करु नका. 7 ते 8 मतदारसंघ आहेत. त्यावर चर्चा सुरु आहे.

आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. तुमच्या भावना, तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे. महायुतीमध्ये आपण जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ. जास्त जागा आल्या तर आपल्याला आपल्या कामाची पोहोचपावती मिळेल".  

महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये आज आगळ वेगळं वातावरण आहे. अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात देशात मोठी विकासकामे झाली आहेत. यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवाय महायुतीलाही पाठिंबा देत आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे लोक आमच्या पाठिशी आहेत, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

पहा काय म्हणाले मुख्यमंत्री
इतर बातम्या
Join Whatsapp Group