हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन
हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन
img
Mukund Baviskar

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे  दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांची भव्य फेरीद्वारे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली.

भालेकर मैदानापासून दुपारी एक वाजेच्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला. रणरणत्या उन्हात निघालेल्या फेऱ्यांनी उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची परीक्षा पाहिली. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपुष्टात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यापुर्वी मंगळवारचा मुहूर्त अनेक उमेदवारांनी साधला.

सेना-भाजपने नाशिक, दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे दाखल करण्याचे ठरवले होते. त्यानुसार बी. डी. भालेकर मैदानावर दोन्ही पक्षांचे  तसेच मित्र पक्षांचे, पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल आहेर, माजी मंत्री बबन घोलप, आमदार राहुल ढिकले, शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी नेते उमेदवारांसोबत रथावर उपस्थित होते. त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पक्षांचे झेंडे आणि कमळ व धनुष्य ही निशाणी अनेकांच्या हाती होती. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दोन्ही उमेदवारांनी पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. बी.डी. भालेकर मैदानावरून निघालेली ही रॅली पोस्ट ऑफिस, गंजमाळ सिग्नल, शालिमार चौक, परशुराम सायखेडकर सभागृह मार्गे, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल मार्गे ही रॅली तथा फेरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group