खा. हेमंत गोडसे यांनी प्रचाराची रणनीती  आखण्यासाठी छगन भुजबळांची घेतली भेट
खा. हेमंत गोडसे यांनी प्रचाराची रणनीती आखण्यासाठी छगन भुजबळांची घेतली भेट
img
DB
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट केवळ निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील असून शंभर टक्के ते विजयी व्हावेत त्याकरिता प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. महायुतीतील राष्ट्रवादी हा घटक पक्ष असून छगन भुजबळ हे महायुतीचे नेते असल्याने निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांची भेट व मार्गदर्शनाकरिता आज खास त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या आदल्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचारासाठी धावपळ झाली. हे वाया गेलेले दिवस भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रचार करीत प्रत्येकाच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन करण्यात येत असल्याचे गोडसे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे, अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group