मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या "या" नेत्याला जीवे मारण्याची धमकी ; "हे" कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
आपल्या आक्रमक भाषणामुळे राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले  शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. याविरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली. त्याचबरोबर सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याचीही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी नेमकी काय धमकी दिली?
मिळालेल्या माहितीनुसार, शरद कोळी यांचा गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात एल्गार सुरु आहे. शरद कोळी यांनी मध्यंतरी नदीत वाळू माफिया करणारे ट्रक देखील पकडून दिले. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या वाळू माफियांनी आता शरद कोळी यांचा बदला घेण्याच्या इराद्यातून त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

शरद कोळी हे 6 जुलैला मित्र संतोष पाटील यांच्यासोबत शिवसेना कार्यालयात बसले होते. याच वेळी अक्कलकोट तालुक्यातील संबंधित वाळू माफियाचा संतोष पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला.

“मागील वेळी शरद कोळींच्या अंगावर लोकांना सोडून गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यात सुदैवाने ते वाचले. मात्र यावेळी वाचणार नाही, जिथे दिसेल तिथे गोळ्या घालू. तसेच सोलापूर शहरातील त्यांचे कार्यालय जाळून टाकू”, अशी धमकी वाळू माफियाने फोनवर दिली. यानंतर शरद कोळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group