ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी
ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी
img
दैनिक भ्रमर
ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांना चाळीसागावातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्याच चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणची लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नितीन देशमुख हे शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुरतला गेले होते. पण ते रातोरात पुन्हा ठाकरे गटात आले होते.

नाशिक मध्य मधून वसंत गीते, पश्चिम मधून सुधाकर बडगुजर, निफाड मधून अनिल कदम तर नांदगाव मधून गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत :


इतर बातम्या
Join Whatsapp Group