ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर! 'या' १७ जणांना मिळाले तिकीट
ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर! 'या' १७ जणांना मिळाले तिकीट
img
दैनिक भ्रमर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन उमेदवारांची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईतून संजय दिना पाटील, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य येथून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.


ठाकरे गटाची उमेदवार यादी

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
उत्तर पश्चिम मुंबई - अमोल कीर्तिकर
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई - संजय दिना पाटील
दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई
ठाणे - राजन विचारे
नाशिक - राजाभाऊ वाजे
रायगड - अनंत गिते
रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
परभणी - संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
सांगली - चंद्रहार पाटील
मावळ - संजोग वाघेरे
शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम - संजय देशमुख
इतर बातम्या
Join Whatsapp Group