नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी "इतके" टक्के मतदान
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गेल्या एक-दीड महिन्यापासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यापासून ते नाराजांची नाराजी दूर करण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आणि आज महाराष्ट्रातल्या शेवटच्या पाचव्या टप्प्याचे मतदान किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले.

यात नाशिकमध्ये 61 टक्के मतदान झाले. त्यात सिन्नर 68 टक्के, नाशिक पूर्व 56 टक्के, नाशिक मध्य 57 टक्के, नाशिक पश्चिम 60 टक्के, देवळाली 61 टक्के, त्रिम्बक 66 टक्के मतदान झाले.

आता उमेदवारांसह सर्व कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचे लक्ष दि. 4 जून रोजी होणार्‍या मतमोजणीकडे व निकालाकडे लागले आहे.
नाशिकमध्ये एकूण 31 उमेदवार असले, तरी मुख्य लढत ही शिवसेनेचे उमेदवार व माजी खासदार हेमंत गोडसे व महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यातच मानली जात आहे.

धार्मिक प्रभावामुळे शांतीगिरी महाराज आणि मराठा आरक्षण मुद्यामुळे करण गायकर हेदेखील बर्‍यापैकी मते मिळविण्याची श्यता आहे.

(टीप : सदर मतदानाची आकडेवारी ही अंदाजित टक्केवारी असून अंतिम टक्केवारी स्वाक्षरीत प्रत मिळाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल)
इतर बातम्या
Join Whatsapp Group