लाच घेताना नगर भूमापन लिपिक एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
लाच घेताना नगर भूमापन लिपिक एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
वैष्णवी सांगळे
नाशिक : ८ हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती ३ हजार रुपयांची लाच घेताना कळवण भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विजय हनुमंत गवळी (वय 43, रा. नम्रता रो हाऊस, नंबर 4, वरद नगर, बोरगड, म्हसरूळ, नाशिक) असे लाच घेणाऱ्या इसमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा वाद सह दिवाणी न्यायाधीश ’क’ स्तर, कळवण यांचे न्यायालयात 2022 सालापासून चालू होता. या न्यायालयाने यातील वादी व प्रतिवादी यांचे गट क्रमांक 168 ची मोजणी करून अहवाल सादर करण्याबाबत तालुका अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय कळवण, जिल्हा नाशिक यांना दि. 25/ 11 /2024 रोजी आदेशित केलेले होते. सदर गट विषयाची मोजणी दि. 21 मे 2025 रोजी आरोपी विजय गवळी यांनी केली.त्याबाबतचा मोजणी अहवाल त्यांचे उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय यांचेकडे सादर करणे करता गवळी यांनी तक्रारदार यांचेकडे 8000 रुपयांची लाचेची मागणी केली.

नाशिकमध्ये दरोडेखोरांचा सुळसुळाट; AC दुरुस्तीचा बहाणा अन भरदिवसा दरोडा

गवळी यांचे विरुद्ध तक्रारदार यांनी दि.30/07/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.या लाचेच्या मागणीची पडताळणी दि. 30/07/2025 रोजी केली असता हा मोजणी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यापूर्वी 3000 रुपये लाच म्हणून द्यावे लागतील व अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर उर्वरित रक्कमेच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे गवळी यांनी केली.ही लाचेची रक्कम पैकी 3000 रुपये आपल्या भूमी अभिलेख कार्यालयात स्वीकारताना गवळी यांना 31/07/2025 रोजी रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध कळवण ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group