दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार?
दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. त्यात नुकतेच राहुल गांधींच्या नेतृत्वात मुंबईत इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे पक्षाला रामराम करून शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्यासाठी सज्ज झालेत अशी बातमी समोर आली आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आज हा पक्षप्रवेश होऊ शकतो.

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेली पारवे-फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात होती. अशातच आता राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे. मात्र रामटेक मतदारसंघात अनेक भागात त्यांचे प्राबल्य आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे राजू पारवे हे या भागात तगडे उमेदवार ठरू शकतात असा महायुतीला अंदाज आहे. अशी माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे. 
राजू पारवे यांना सोबत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे अखेर आज पारवे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून रामटेकमधून निवडणुकीला उभे राहणार असल्याची माहिती आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group