नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल; यांची लागली वर्णी
नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल; यांची लागली वर्णी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही फेरबदल करण्यात आले आहेत. 


नाशिक लोकसभेचे संभाव्य उमेदवार व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती केली आहे. तर सुधाकर बडगुजर यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी गटनेते विलास शिंदे यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहीती देण्यात आली आहे.विजय करंजकर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यानंतर नाशिक लोकसभेची जागा भाजपकडून लढण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीनेच थेट नाशिकवर दावा ठोकत थेट दिल्लीपर्यंत धाव घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतर्फे हेमंत गोडसे हे नाशिकमधून विद्यमान खासदार असल्याने रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group