गोळीबार घटनेवरून विजय वडेट्टीवारांची जहरी टीका; म्हणाले भाजप आणि शिंदे गट यांचा माज...
गोळीबार घटनेवरून विजय वडेट्टीवारांची जहरी टीका; म्हणाले भाजप आणि शिंदे गट यांचा माज...
img
दैनिक भ्रमर
उल्हासनगर येथे भाजप आमदार यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना काल रात्री घडली. यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेवरून वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

घटनेनंतर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपावाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे.

गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!
इतर बातम्या
Join Whatsapp Group