5 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नाशिकच्या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
5 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नाशिकच्या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- 5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकासह सहकार अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिमराव यशवंत जाधव (वय 45) हे सहकार अधिकारी, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग,नाशिक पद-वर्ग 3 व अनिल नथ्थुजी घरडे (वय ५२) हे सहाय्यक सहकार अधिकारी/वरिष्ठ लिपिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक पद-वर्ग 3 अशी लाच मागणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे को- ऑप क्रेडिट सोसायटीचे क्लार्क असून सोसायटीचे नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणुन सभासद यांचे घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे  सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली आहे. 

या प्रकरणाची चौकशी कार्यालयात सुरू होती. या कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या  को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या बाजूने देण्यासाठी जाधव व घरडे यांनी तक्रारदाराकडे 6 लाख रुपयाची मागणी केली. दि. 7/12/2023 व दि.8/12/2023 रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केली.  म्हणुन दोघांवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 , 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे,पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group