५ हजारांची लाच घेताना कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत लिपिक एसीबीच्या जाळ्यात
५ हजारांची लाच घेताना कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत लिपिक एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- ५ हजारांची लाच घेताना कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत जळगाव महानगरपालिकेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 

आनंद जनार्दन चांदेकर (वय 37, लिपिक, रा. देविदास कॉलनी पंचमुखी हनुमान नगर च्या मागे, जळगाव), राजेश रमण पाटील (वय 35, कंत्राटी कर्मचारी, रा.प्लाॅट नं.8, भुषण काॅलनी, गिरणा टाकीजवळ, जळगांव.) असे लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची कर सल्लागार संस्था असुन त्यांना एका संस्थेला नविन बसस्थानक, जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनिक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता टेंडर भरणे व त्या संबधीत काम तक्रारदार हे करीत होते. त्याप्रमाणे दि. 4/4/2025 रोजी सदर संस्थेतर्फे नविन बस स्थानक जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनिक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता मिळणेकामी महानगरपालीका जळगाव येथे टेंडर दाखल केले होते.

तसेच टेंडर करिता 35,000 रुपये अनामत रक्कम डी.डी.द्वारे महानगर पालिकेस भरली होती. परंतु सदरचे टेंडर सदर संस्थेला मिळाले नाही. म्हणुन टेंडर मिळणेकरिता भरलेली 35,000 रुपये अनामत रक्कम परत मिळणेकरिता अर्ज तयार करून हा अर्ज तक्रारदार यांनी दि. 29/07/2025 रोजी महानगरपालीका जळगाव येथे जमा करून अनामत रक्कमे संदर्भात आरोपी  लिपिक आनंद चांदेकर यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सदरची 35,000 रुपये अनामत रक्कम परत मिळुन देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे 5,000 रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 19/08/2025 रोजी ला.प्र.विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक 19/8/2025 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता यातील चांदेकर यांनी तक्रारदार यांचेकडे महानगरपालिकेत भरलेली अनामत रक्कम मिळुन देण्याकरीता 5000 रुपये लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम राजेश पाटील यांचेकडे देण्यास सांगितली. त्याचवेळी पाटील यांनी चांदेकर यांचेकरीता 5000 रूपये लाचेची मागणी केली.

त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार हे आनंद जनार्दन चांदेकर यांना भेटले असता त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दिनांक 19/08/2025 रोजी लाचेची रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगुन स्वतः स्विकारली. म्हणून चांदेकर यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group