नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक लाच घेताना जाळ्यात
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक लाच घेताना जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- येथील जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 

नितीन रामचंद्र तिवडे (वय 56, कक्ष सेवक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक रा. शिवपुष्प  सोसायटी, रो हाऊस नंबर 23, मीरा द्वार लॉन्स समोर, माने नगर, मेरी- रासबिहारी लिंक रोड, नाशिक) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांना अपघात होऊन त्यांच्या हाताच्या उजव्या कोपरास दुखापत झाली होती. याबाबत त्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते व कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक येथून fit for duty असे प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालय येथे OPD पेपर काढला होता. तेव्हा या OPD पेपरवर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर यांनी Pt fit for duty असा रिमार्क मारला.

तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय रुग्ण निवेदन केलेल्या प्रमाणपत्राच्या पाठमागील बाजूस असलेल्या प्रमाणपत्र यावर सदर नोंद घेण्यास सांगितले असता त्यांनी मामाला जाऊन भेटा ते पुढचे प्रमाणपत्र देतील. त्यावर तक्रारदार हे तिवडे यास भेटले असता त्यांनी तक्रारदार यास सदरील प्रमाणपत्र यावर fit for duty असा रिमार्क मारून आणून देण्याच्या मोबदल्यात 1500 रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना तिवडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांना संपर्क केला असता तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यांनी सापळा रचला असता तावडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group