इगतपुरी नगरपरिषदेच्या तिघांनी मागितली १ लाख ७० हजार रुपयांची लाच
इगतपुरी नगरपरिषदेच्या तिघांनी मागितली १ लाख ७० हजार रुपयांची लाच
img
दैनिक भ्रमर


कामाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात १ लाख ७० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी इगतपुरी नगरपरिषदेच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितीन दगडू लोखंडे (वय ४४व) सफाई कामगार, सुरज रविंद्र पाटील (वय ३२) संगणक अभियंता व सोमनाथ बोराडे लेखापाल, ईगतपुरी नगर परिषद अशी लाच मागणाऱ्या तिघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी केलेल्या इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याचे मोबदल्यात स्वतः करिता तसेच मुख्याधिकारी यांचे करिता सर्वांचे मिळून २७ टक्के प्रमाणे एकूण १,९०,००० रुपये त्यापैकी १,७०,००० रुपये लाचेची मागणी केली.

त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचेकडे  तक्रार दिलेली आहे. दिनांक २५/४/२०२५ व २/५/२०२५ रोजी तक्रारदार यांचेकडे यातील आरोपींनी लाचेची मागणी केलेली आहे.

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपींनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ , १२ प्रमाणे गुन्हा केला आहे. तिघा जणांविरुद्ध विरुद्ध इगतपुरी  पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group