मोठी बातमी :
मोठी बातमी : "या" प्रकरणात केंद्र सरकारच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
img
Dipali Ghadwaje
नागपुरमधून एक खळबळजनक बातमी समोर आलीये. CBI ने लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारच्या PESO दोन अधिकाऱ्यांसह चौघांना अटक केलीये. सीबीआयने घराची झाडाझडती घेतली असता आतापर्यंत 2.15 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. '

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका अधिकाऱ्याच्या घरात 90 लाख रुपये सापडले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील खाजगी व्यक्तीकडून प्रियदर्शन देशपांडे यांच्या घरातून 1.25 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. नागपुरच्या लक्ष्मीनगर येथील प्रियदर्शन दिनकर देशपांडे आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवी सिंग कछवाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 यासह राजस्थान येथील रहिवासी असलेले देवी सिंग यांच्याकडून 10 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने काल सेमिनरी हिल्स येथील पेसो कार्यालयाजवळ टायपिंग सेंटरवर सापळा रचत ही कारवाई केली आहे.

राजस्थानच्या चित्तोगडमध्ये असलेल्या स्फोटक कंपनीत तयार होणारे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरची निर्मिती क्षमता वाढवून देण्यासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group