नाशिक:- २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर शांताराम शिंपी (वय 42) ग्रामसेवक, सजा तळेगांव (अं), ता. जि.नाशिक असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मुलास तळेगांव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता 996538 रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगांव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये 7,47,700 रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता शिंपी यांनी आज तक्रारदार यांचेकडे 25000 रुपये लाचेची मागणी केली.
ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्र्यंकेबश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोहवा प्रफुल्ल माळी, पोना/ विलास निकम यांनी केली