54 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
54 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आपल्याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याची प्रवास बिले मंजूर करून पुढे पाठविण्यासाठी 54 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे (राजपत्रित गट ब) यांना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची एकूण 9 लाख 37 हजार 533 रुपयांची प्रवास भत्त्याची बिले मंजूर करण्यासाठी एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम शुभांगी बनसोडे यांनी लाच म्हणून मागितली होती. यापैकी लाच रकमेचा पहिला हप्ता म्हणून 54 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

धुळे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, कॉन्स्टेबल प्रशांत बागूल, चालक हवालदार जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. याबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा पथकाचे अभिनंदन केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group