झिरवाळ यांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिकाची बंडखोरी
झिरवाळ यांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिकाची बंडखोरी
img
DB
राष्ट्रवादीचे नेते झिरवाळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुतीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकाने बंडखोरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले यांनी  बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातून धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा होणार का? असा सवाल विचारला जातोय.

धनराज महाले हे शिवसेनेकडून  दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group