"नणंद बाईला फक्त कडक नोटा आवडतात" ; नवनीत राणांचा कोणावर हल्ला?
img
Dipali Ghadwaje
अमरावती :  तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ बोलत असताना नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. म्हणाल्या "देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केलेले आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून  प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात"

नवनीत राणा म्हणाल्या, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये  विभाजन करून मत घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध  दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचा घर लुटले, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते

पुढे बोलताना राणा म्हणाल्या, 15 वर्षांनंतर महिलांची आठवण झाली. 15 वर्षानंतर डब्बे दिले गोरगरीबांना...राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी येथील स्थानचा आराखडा तुम्ही वाचा. ज्या मोजणी आराखड्यामध्ये जेवढा फंड 2014 नंतर आमच्या सरकारने दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते, तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचे किती वाटोळे नणंद बाईने केले असेल? 
 
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, खोटं एकच वेळ चालते डबल डबल चालत नाही. नणंद बाईकडे खूप माल आहे. कडक नोटा आहेत. दिले तर घ्याच खूप कमावले आहेत. निवडणुकीसाठी शेत विकावं लागतं म्हणते. कागदपत्रे दाखव कोणते शेत विकले? आज जो खासदार झाला तो वॉचमन झाला आहे. घरचा वॉचमन झाला आहे, 25 लाख लोकांचा खासदार आहे. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group