नवनीत राणा यांचे बॅनर हटवले, 'हे' कारण आले समोर
नवनीत राणा यांचे बॅनर हटवले, 'हे' कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
विनापरवाना बॅनर लावल्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर मोठी  कारवाई केली आहे.अमरावतीच्या चांदूर बाजार येथे हे बॅनर लावण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बॅनरवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करत नवनीत राणा यांचे बॅनर काढून टाकले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील तळवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बॅनर लावण्यात आले होते.

तळवेल ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांचे तळवेल गाव असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असल्याने हा प्रकार घडला असल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group