लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया
img
Dipali Ghadwaje
अमरावती : अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसला, त्यानंतर नवनीत राणा या पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन बोलल्या आहेत. नवनीत राणांच्या पराभवामध्ये बच्चू कडू यांच्या उमेदवारानेही महत्त्वाची भूमिका बजावली, त्यावरही नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान यांची शपथ होती, मी भाजपची कार्यकर्ता आहे, त्यामुळे दिल्लीत जाण्यात काहीही गैर नाही, यापूर्वी पाच वर्ष दिल्लीतच होते, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. पराभव होऊनही आम्ही जिंकलो आहे, कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत. मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केलं, त्यानंतर मला कळालं नाही की यंदा जनतेने मला का थांबवलं? राज्यात काम करायचं की कुठे, हे ठरवलं नाही, असंही नवनीत राणांनी स्पष्ट केलं.

काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोक दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. तसंच एससी एसटीचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलं जाणार असेल तर मी एससी एसटी समाजासोबत उभी राहिन, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे.

अमरावतीमध्ये काय घडलं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे. आम्हा कार्यकर्त्यांना त्यांना सांगायची गरज नाही. मोदी एकटे लढले, त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोक झुंड बनवून त्यांना रोखत होते. एससी एसटी समाजातील लोकांना खोट्या स्वरूपात संविधान बदललं जाईल, असा प्रचार केला गेला. एससी एसटी समाजाला खोट्या प्रचाराची जाणीव होईल, असं म्हणत नवनीत राणांनी विरोधकांवर निशाणा साधला.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group