मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय ; नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय ; नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
img
Dipali Ghadwaje
अमरावती : राज्यात लोकसभेची धामधूम सुरु आहे. सर्वच नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका सुरु केला आहे.  अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. दरम्यान एका  भाषणात "मला पराभूत करण्यासाठी राज्यातल्या दिग्गजांना अमरावतीत यावं लागतंय, यातच माझा विजय आहे. मी तुमच्या जिल्ह्याची सून आणि लेक आहे, मी तुमच्यासाठी माझ्या रक्ताचं पाणी केलंय असं भाजपच्या उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या".

भाषण सुरू असताना त्यांनी समोरच्या लोकांना पाणी पाजण्याच्या सूचना दिल्या. हेच अमरावतीकर नंतर विरोधकांना पाणी पाजतील असा टोला त्यांनी लगावला. 

नवनीत राणा म्हणाल्या की , "विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना आज या जिल्ह्यात यावं लागतंय हे अमरावतीच्या जनतेचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यश आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी 33  महिने मातोश्री सोडली नाही, त्यांना आता अमरावतीत यावं लागलं. अनेक लोक इथं येऊन माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्या कामामुळे मला काही टेन्शन नाही. शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही."
 
अमरावतीमध्ये तिरंगी लढत
अमरावती लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू असून दोघांकडूनही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने अमरावतीचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group