अग्नितांडव! गॅरेजला आग लागून 30-35 वाहनं जळून खाक
अग्नितांडव! गॅरेजला आग लागून 30-35 वाहनं जळून खाक
img
DB
अमरावती जिल्ह्याच्या वरुड शहरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. वरुड शहरातील एका गॅरेजला आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील ३०- ३५ गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरातील पांढुर्णा मार्गावर पिंटू कावटकर यांच्या मालकीचे 'पिंटु गॅरेज' नावाचे दुकान आहे. या गॅरेजला गुरूवारी (१८, जानेवारी) रात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने संपूर्ण गॅरेजला वेढा घातल्याने ३०- ३५ गाड्या जळून  खाक झाल्या. या दुर्घटनेत मालक पिंटु कावटकर यांचे जवळपास ३ कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही आग नेमकी कशी लागली? आग अपघाताने लागली की मुद्दामहून लावण्यात आली? याबाबत आता उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मालक पिंटू कावटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group