कंगना रणौतला ‘इमर्जन्सी’ साठी  मुंबई हायकोर्टाचा  मोठा झटका ! ''हे'' आहे कारण
कंगना रणौतला ‘इमर्जन्सी’ साठी मुंबई हायकोर्टाचा मोठा झटका ! ''हे'' आहे कारण
img
दैनिक भ्रमर

अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौत हिनं दिग्दर्शित केलेल्या आणि झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइजेसची निर्मिती असलेल्या ‘ईमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डने हिरवा कंदील दिला नसल्यानं निर्माण झालेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता. येत्या सहा तारेखाला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं 'इमर्जन्सी' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. मात्र हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डला कालमर्यादा घालून दिली आहे.

या प्रकरणी इतक्या लवकर आदेश देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय. या प्रकरणी 18 सप्टेंबरपर्यंत निर्णय होईल. म्हणजे 19 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी होईल. त्याशिवाय CBFC ला सुद्धा कोर्टाने फटकारलय. चित्रपटांवर कोट्यवधी रुपये लागलेले असतात. गणपती उत्सवाच्या सुट्टीच कारण देऊन सर्टिफिकेट संबंधीच्या विषयावरुन CBFC ला पळ काढता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय.

जी एंटरटेनमेंट या प्रकरणात याचिकाकर्ता आहे. फिल्ममध्ये ते सहनिर्माता आहेत. त्यांच्यावतीने कोर्टात वरिष्ठ अधिवक्ता वेंकटेश धोंड हजर झाले. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाकडून (सीबीएफसी) अधिवक्ता अभिनव चंद्रचूड हजर झाले. कोर्टाने सेंसर बोर्डाला निर्देश दिले की, चित्रपटासंबंधी जे आक्षेप आहेत, त्यावर विचार करा आणि 18 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र जारी करा. कोर्टाच्या या आदेशानंतर चित्रपट आता 6 सप्टेंबरला रिलीज होणार नाही. प्रदर्शन दोन आठवड्यांसाठी टळलं आहे.

जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेजने चित्रपट ठरलेल्या तारखेला रिलीज करण्याची मागणी करताना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात इमर्जन्सी चित्रपटाला प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश देण्याची विनंती होती. सेंसर बोर्डाकडे प्रमाणपत्र तयार आहे. पण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रमाणपत्र रिलीज करण्यात येत नाहीय असं याचिकेत म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group