ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलं आहे . अवघ्या आहे 3 दिवसात 34 कोटींचा रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाची भव्यता आणि त्यातील स्टारकास्ट यामुळे याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'देवरा' बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विशेषत: ज्युनियर एनटीआरच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा मन जिंकले आहे.

कोरटाला सिवा दिग्दर्शित, या चित्रपटात ज्युनियर एनटीआर सोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत आहेत. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने प्रत्येक भाषेत बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड राखली आहे.