तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील "या" कलाकारावर दुःखाचा डोंगर; आधी भावाचे निधन आणि आता ...
img
Dipali Ghadwaje

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र, अनेक कलाकार मालिका सोडून गेले असून नवीन कलाकारही मालिकेत दाखल झाले आहेत. मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात जेनिफर मिस्त्री ही सध्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे.

जेनिफर मिस्त्री हिच्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे सात बहिणींची जबाबदारी ही जेनिफर मिस्त्री हिच्यावर आली. मागील दीड वर्षांपासून जेनिफर मिस्त्री हिच्या हाताला काम नाहीये. त्यात जेनिफरची बहीण आजारी असून ती व्हेंटिलेटरवर आहे. जेनिफरच्या बहिणीवर रूग्णालयात उपचार सुरू असून ती त्यांच्या मुळगावी आहे.

जेनिफर मिस्त्री म्हणाली की, माझ्या बहिणींला सर्वात जास्त सध्या माझी गरज आहे, यामुळे मी तिला एकटे सोडून नाही येऊ शकत. आयुष्यात खूप जास्त अडचणी आहेत. मागील दीड वर्षांपासून माझ्याकडे काही काम नसून सात मुलींची जबाबदारी ही माझ्यावर आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group