प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरातच संपवलं आयुष्य
प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरातच संपवलं आयुष्य
img
DB
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विजय एंटलीची लाडकी लेक मीरा अँटोनी चेन्नईमधील अलवरपेट येथे राहत्या घरी पहाटे 3 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीरा तणावाखाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मीरा ही बारावीत होती. चेन्नईतील एका लोकप्रिय महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. विजय अँटोनी हे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव आहे. विजय हा अभिनेता असण्यासोबत संगीतकार आणि निर्माताही आहे. विजयच्या पत्नीचे नाव फातिमा असून तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. आता मीराने आत्महत्या केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group