इगतपुरी (प्रतिनिधी ) : इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील एका दाम्पत्याने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दिनेश देविदास सावंत (वय 38) व विशाखा दिनेश सावंत (वय 33, दोघेही रा. सुधानगर, घोटी) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
हे ही वाचा !
काल सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इगतपुरीकडे जाणार्या रेल्वे रूळावर चालत्या रेल्वेखाली दाम्पत्याने आपले जीवन संपवले. देविदास देवाजी सावंत यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घोटी पोलीस पुढील तपास करीत आहे.