खळबळजनक घटना : बॉयफ्रेंडने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले , एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या तरुणीने थेट घेतला टोकाचा निर्णय
खळबळजनक घटना : बॉयफ्रेंडने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले , एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या तरुणीने थेट घेतला टोकाचा निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : बॉयफ्रेंडच्या छळाला कंटाळून एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या तरुणीने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिने आत्महत्या करण्याच्या अगोदर बॉयफ्रेंडला फोन केला. बॉयफ्रेंडला फोन करून तिने सांगितले की, ती आत्महत्या करत आहे. तरुणीच्या घरच्यांनी बॉयफ्रेंडवर अनेक गंभीर आरोपही केले. बॉयफ्रेंडविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलीये. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव सृष्टी तुली होते. ती एअर इंडियामध्ये पायलट होती. आदित्य पंडित हा देखील पायलट आहे. दोघांचे अफेअर दोन वर्षांपासून सुरू होते. मात्र, आदित्य तिला मानसिक त्रास देत. प्रेमामध्ये असल्याने काय चूक आणि काय बरोबर हे सृष्टीला कळत नव्हते. सृष्टीने आत्महत्या करण्याच्या बारा दिवस अगोदर आदित्यने तिला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले. यामुळे ती मानसिक धक्क्यात होती.

25 नोव्हेंबरला रात्री तिने आदित्यला फोन केला आणि सांगितले की, ती आत्महत्या करत आहे. हे ऐकून आदित्यला मोठा धक्का बसला. तो तिला वाचवण्यासाठी गेला. पण फ्लॅट बंद होता. आदित्य आणि सृष्टी यांच्यामध्ये यापूर्वीही टोकाची भांडणे झाली होती. हेच नाही तर हॉटेलमध्ये जेवणासाठी हे दोघे काही दिवस अगोदर गेले होते, तिथे देखील दोघांमध्ये वाद झाला. भर रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळी तो सृष्टीला एकटे सोडून गेला होता.

व्हॉट्सॲपवर ब्लॉक आदित्यने केल्याचा तिला इतका जास्त राग आला की, तिने थेट आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलले. यासोबत सृष्टीच्या कुटुंबियांकडून आदित्य याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आमच्या मुलीच्या आत्महत्येला तोच कारणीभूत असल्याचे तिच्या घरच्यांनी म्हटले. एअर इंडियाच्या एका महिला पायलटने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. या प्रकरणी अधिक तपास हा पवई पोलिसांकडून केला जातोय. सृष्टी आणि आदित्य यांची पहिली भेट ही दिल्ली येथे झाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group