प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
घरातील कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून 19 वर्षे तरुण प्रेमीयुगलकाने घरात एकाच जोडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ही उघडकीस आली आहे. दरम्यान घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस नाईक अतुल पखाले विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हे प्रेम युगलक मुळशी तालुक्यातील माले येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. या तरुणाचे वडील नोकरी निमित्त शिक्रापूर येथे स्थायिक होते. करंजेनगर मध्ये राहणारे या तरुणाचे वडील हे गावी गेलेले होते, त्याच दरम्यान या तरुणाने त्याची प्रियसी हिला घेऊन घरी आलेला होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वडील गावाकडून शिक्रापूर येथे येण्यासाठी निघाले असता त्यांनी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून मुलाकडे फोन देण्यास सांगितले. शेजारील व्यक्ती यांच्या घरात गेले असता यांना तरुण व त्याच्या प्रियसीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. 

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाली आहे. दरम्यान या चिठ्ठीत "आम्ही आमच्या स्वच्छेने आत्महत्या करत आहे यात आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही , आमच्यामुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना त्रास होणार नाही" असा मजकूर लिहिलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group