चिठ्ठीत 'एक मराठा लाख मराठा' लिहून तरुणाची आत्महत्या
चिठ्ठीत 'एक मराठा लाख मराठा' लिहून तरुणाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
राज्यात आरक्षणाचा विषय तापलेला असतानाच आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय.
 
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार , कळंब तालुक्यातील हळदगाव येथील प्रतिक रनजित सावंत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करण्याआधी त्याने स्वत: एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती. यामध्ये त्याने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही लिहिलं होतं.
 
शेतामध्ये कामानिमित्त तो थांबला होता. येथेच त्याने पञ्याच्या शेडला गळफास घेऊन आपले जिवन संपवले. जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. मी प्रतिक रंजित सावंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे,आरक्षण मिळालंच पाहिजे. मी माझे आयुष्य याच्यासाठी संपवत आहे. तरी सरकारने याची दखल घ्यावी. एक मराठा लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी लिहुन तरुणाने आत्महत्या केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणबाबत आता सरकारकडून पुढे काय पाऊल उचलली जातील ते बघणं महत्वाचा ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group