धक्कादायक :
धक्कादायक : ".... म्हणून १९ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन संपवले जीवन ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
19 वर्षीय मुलीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना कर्नाटकातील मैंगलोर येथे समोर आली आहे.  ही मुलगी बीए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती आणि तालापाडी येथील किन्या भागात राहत होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले.

 मिळालेल्या माहितीनुसार ,  मृत मुलीची ओळख 19 वर्षीय श्रेया अशी झाली आहे. तिने मंगळवारी, 24 जून रोजी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीच्या मृतदेहाचा ताबा घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. श्रेयाच्या खोलीतून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. ज्यामध्ये तिने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली. श्रेयाच्या खोलीतून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, तिच्या सावळ्या रंगामुळे तिचा अपमान केला जात होता. मे महिन्यात तिने एका कागदावर लिहिले होते की, कोणीही तिच्यावर प्रेम करत नाही आणि तिच्यामुळे तिच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तिची जगण्याची इच्छा संपली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयाने तिच्या खोलीतील कपाटावरही लिहिले आहे की, ‘मला ही पिढी आवडत नाही, म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.’

दरम्यान  तपासात समोर आले आहे की, श्रेया बीए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती पहिल्या सत्रात दोन विषयांत नापास झाली होती. तिच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, श्रेया शांत स्वभावाची मुलगी होती आणि ती इतरांशी फार कमी बोलत असे. ती मैंगलोरमधील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती आणि बीएचे शिक्षण घेत होती. श्रेयाच्या सुसाइड नोटनुसार, तिच्या सावळ्या रंगामुळे तिचा अपमान होत होता, ज्यामुळे ती खूप दुखावली गेली होती. याच कारणामुळे ती मानसिक तणावात होती.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group