आपली आर्थिक स्थिती पाहूनच हाय पाय पसरायला हवेत. पण कधीकधी परिस्थितीकडे कानाडोळा करून अनेक निर्णय घेतले जातात, त्यानंतर मोठी संकटे ओढावतात. असाच काहीसा प्रकार तेलंगणाच्या सिद्धिपेट जिल्ह्यातुन समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , २१ वर्षीय मुलाने शेत मजूर बापाकडे BMW गाडी आणि अलिशान घर हवं, असा हट्ट धरला होता. पण परिस्थिती बेताची असल्यामुळे बापाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या मुलाने आत्महत्या केली.
तेलंगणामधील सिद्दीपेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. या घटनेनंतर सिद्दीपेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २१ वर्षीय तरुण दहावीपर्यंत शिकला होता. पण तो बेरोजगार होता आणि दारूच्या आहारी गेला होता. तो पालकांना शेतीच्या कामात मदत करत होता. त्याच्या कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. २१ वर्षीय मुलाला अलिशान घर आणि BMW गाडी हवी होती. '
गेल्या काही काळापासून तो यासाठी आई-बापांवर दबाव टाकत होता. पण आर्थिक अडचणीत असणाऱ्या बापाला मुलाचा हट्ट पुरवणं शक्य झालं नाही. मुलाने टोकाचे पाऊल उचलले.
२१ वर्षीय मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, BMW न मिळाल्यास मुलाने आत्महत्येची धमकी दिली होती. आर्थिक अडचणींमुळे Maruti Swift Dzire घेऊ असं त्याला सांगतिलं होतं. शुक्रवारी दुपारी सिद्दीपेटमधील एका कार शोरूमला भेट दिली.
पण Swift Dzire च्या निर्णयामुळे तो निराश झाला होता. दुपारी ३:३० च्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपल्या वडिलांना याबाबत कळवले. वडील आणि मोठ्या भावाने त्याला मोटरसायकलवरून सरकारी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला RVM रुग्णालयात हलवण्यात आले, पण शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.