मराठा आरक्षणासाठी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
गणेश काकासाहेब कुबेर असे या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाच नाव आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे एक शाळेतील पाटीवर लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.