धक्कादायक घटना :
धक्कादायक घटना : "....म्हणून राहत्या घरात दांपत्याची आत्महत्या , गळफास घेऊन संपवलं जीवन
img
Dipali Ghadwaje
पुण्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोलीजवळ आव्हाळवाडी येथे एका व्यक्तीने पत्नीसह राहत्या घरात गळफास घेतला. दोन्ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडीत पती-पत्नीने घरात आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. नागनाथ वारुळे (वयवर्ष ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वयवर्ष ४०) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली, सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

नागनाथ वारुळे आणि त्यांची पत्नी उज्वला या वाघोली येथील दैनंदिन बाजारात फळ विक्री करण्याचे काम करत होते. दोघेही काबाडकष्ट करत होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. वाघोली पोलीस मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

आर्थिक अडचणींमुळे फळ विकण्याचे काम करणाऱ्या दांपत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी (११ मे) रोजी रात्री दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (१२ मे) रोजी ही घटना समोर आली. याबात वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group