धक्कादायक : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन
धक्कादायक : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन
img
Dipali Ghadwaje
नाशिकसह जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अस्मिता संजय पाटील (18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अस्मिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अस्मिता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group