प्रेमाचा करुण अंत! कुटुंबाचा लग्नाला विरोध , प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर घेतली उडी
प्रेमाचा करुण अंत! कुटुंबाचा लग्नाला विरोध , प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर घेतली उडी
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील विक्रोळी स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली.लग्नाला कुटुंबाने विरोध केल्यामुळे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आयुष्य संपवलेय.आत्महत्येची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आलाय. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मुलाचे वय १९ तर मुलीचे वय १५ इतके असल्याचे समजतेय. रविवारी विक्रोळी स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

१५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षांच्या मुलाचे एकमेकांवर प्रेम जडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते प्रेमात होते. दोघांना धूमधडाक्यात लग्न करून संसार थाटायचा होता. पण कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे कुटुंबाचा विरोध होता. घरातून होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने टोकाचा निर्णय घेतला . दोघांनी विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्सप्रेस ट्रेनच्या समोर उडी घेत आयुष्य संपवले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group