धक्कादायक : पुलावरून उडी घेत डॉक्टर महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोध सुरु
धक्कादायक : पुलावरून उडी घेत डॉक्टर महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोध सुरु
img
DB
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून ४३ वर्षीय महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. मुंबईतील रहिवाशी असलेली माहिला डॉक्टर असल्याची माहिती समोर येत आहे. सदर महिला मुंबईहून टॅक्सीने अटल सेतूवर आली होती.
 
महिला अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून महिलेने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे, मात्र अद्याप महिलेचा मृतदेह मिळाला नसून पोलीस शोध घेत आहेत. सदर महिला आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होती.पेश्याने डॉक्टर असणारी ही महिला मागील दहा वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. 

महिला डॉक्टरने घरातून निघताना सुसाईड नोट देखील लिहिली होती. ज्यात तिने अटल सेतूवरून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group