धक्कादायक घटना : 6 महिन्यांच्या मुलीला मिठीत घेतलं अन् महिलेने थेट.......
धक्कादायक घटना : 6 महिन्यांच्या मुलीला मिठीत घेतलं अन् महिलेने थेट.......
img
Dipali Ghadwaje
ग्रेटर नोएडातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे आईने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला मिठीत घेऊन 16 व्या मजल्यावरून उडी मारली. यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोघींचेही मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून आपल्या कुटुंबाला भेटायला आलेल्या एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला कुशीत घेत 16व्या मजल्या उडी मारली आहे. या माय-लेकींचा जागीत मृ्त्यू झाला आहे. सारिका असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला तिच्या मुलीच्या जन्मापासून आरोग्याच्या विविध समस्यांशी झुंज देत होती. यातून ती हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली होती. 

महिला सुमारे दोन आठवड्यांपूर्वी तिच्या दोन मुलांसह भारतात आली होती. सध्या ती ग्रेटर नोएडा येथे तिचा भाऊ आणि आईसोबत राहत होती. या दुःखद घटनेच्या दोनच दिवस आधी कुटुंबाने तिच्या ४ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस आनंदाने साजरा केला होता.
 
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्रीचे जेवण केले आणि सारिका रात्री तिच्या खोलीत झोपायला गेली. मात्र त्याच रात्री तिने मुलीसोबत उडी घेत आत्महत्या केली. रात्री १२.१७ वाजता सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेच्या भावाने सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी तिच्या मुलीला जन्म दिल्यापासून तिची शारीरिक समस्या जाणवत होत्या. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.  

या घटनेचा तपास सुरू असून पोलीस कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाब नोंदवून घेत आहेत. तपासादरम्यान जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group