ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेक आराध्यासह राहतेय....
ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेक आराध्यासह राहतेय....
img
DB
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्याही चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता ऐश्वर्याने सासरचं घर सोडलं असल्याचं समोर आलं आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या फक्त लेक आराध्या बच्चनसोबतच दिसून आली आहे. ऐश्वर्याने आता अमिताभ बच्चन यांचा 'जलसा'   बंगला सोडला असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्या राय सध्या आराध्यासोबत तिच्या माहेरी आई वृंदा रायसोबत राहत आहे.

अमिताभ बच्चन यांचा नातू अहस्त्य नंदाने 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला ऐश्वर्या राय बच्चनने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आराध्या,  अभिषेक आणि बिग बींसोबत फोटोही क्लिक केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group