कंगनाबाबतच्या
कंगनाबाबतच्या "त्या" आक्षेपार्ह पोस्टवरून काँग्रेस नेत्यावर टीकेची झोड
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतवर अश्लील पोस्ट केल्याने काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट बॅकफूटवर आल्या आहेत.

सुप्रिया यांच्या अकाउंटवरून ती पोस्ट डिलीट करण्यात आली असली तरी भाजप नेत्यांनी त्याच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने सुप्रिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पोस्टवर कंगनाने तिच्या एक्स हँडलवरून सुप्रियाला यांना सडेतोड उत्तर दिले आहे. भाजपने यापूर्वीच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडे सुप्रिया श्रीनेट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुप्रिया यांच्या पोस्टवर कंगनाचे उत्तर
कंगना रणौतने सुप्रिया श्रीनेट यांच्या वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टला चोख उत्तर दिले आहे. कंगनाने तिच्या ऑफिशियलवर लिहिले आहे की, राणीमधील एका निष्पाप मुलीपासून ते धाकडमधील मोहक गुप्तहेरपर्यंत, मणिकर्णिकामधील देवीपासून ते चंद्रमुखीतील राक्षसापर्यंत, रज्जोमधील वेश्येपासून थलायवीमधील क्रांतिकारक नेत्यापर्यंत सर्व भूमिका केल्या आहेत.

प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानाची पात्र आहे. आपण सेक्स वर्कर्सचा आदर केला पाहिजे आणि अशा महिलांबद्दल कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा अपमान टाळला पाहिजे. 

सर्वत्र टीका होत असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी आज इन्स्टाग्राम हँडलवरून खुलासा केला आहे. सुप्रिया यांनी X वर लिहिले की, माझ्या मेटा अकाऊंटवर (FB आणि Instagram) ॲक्सेस असलेल्या कोणीतरी अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केली, जी काढून टाकण्यात आली आहे.

जो कोणी मला ओळखतो त्याला कळेल की मी असे कधीही स्त्रीला म्हणणार नाही. तो माझ्या नावाचा गैरवापर करत असल्याचे मला आढळले आहे. माझ्या नावानेही कुणीतरी ट्विटर वापरायला सुरुवात केली आहे. याबाबत मी तक्रार केली आहे.

Dear Supriya ji
In the last 20 years of my career as an artist I have played all kinds of women. From a naive girl in Queen to a seductive spy in Dhaakad, from a goddess in Manikarnika to a demon in Chandramukhi, from a prostitute in Rajjo to a revolutionary leader in Thalaivii.… pic.twitter.com/GJbhJTQAzW

— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 25, 2024
इतर बातम्या
Join Whatsapp Group