कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान
कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूडच्या ‘पंगा गर्ल’ने काल दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर ५० वर्षांचा इतिहास मोडत रावण दहन केले आहे. कंगना रनौतने ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मान मिळालेला आहे. काल नवी दिल्लीच्या लाल किल्ला मैदानामध्ये ‘लव कुश रामलीला’ या कार्यक्रमामध्ये कंगनाच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.

बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतने लाल किल्ल्यावर रावण दहन केलं आहे. 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला हा मान मिळाला आहे. कंगनाने नवी दिल्लीतील लव कुश रामलीला इथे रावण दहन केलं आहे.

लाल किल्ल्यावर दरवर्षी रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदा 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्त्रीने बाण मारून रावणाचा पुतळा जाळला असल्याचं दिल्लीच्या लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले.

'पंगाक्वीन'ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,"आज मला दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश राम लीलामध्ये रावण दहन करण्याचे सौभाग्य मिळाले. ज्याप्रमाणे श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक राक्षसांशी लढतात. जय श्री राम,”

रावण दहनासाठी कंगनाची निवड का? 
रावण दहनासाठी कंगना रनौतची निवड करण्यात आली आहे. अभिनेत्रीची निवड करण्याबद्दल लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले,"गेल्या महिन्यात संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकालानंतर समितीने कंगना रणौतच्या हस्ते रावण दहन करण्याचा निर्णय घेतला".

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत , अर्जुन सिंह म्हणाले की,"फिल्मस्टार असो की राजकारणी दरवर्षी आमच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाहुणे असतात. यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले आहे. चित्रपट स्टार्सपैकी अजय देवगण आणि जॉन अब्राहम येथे आले आहेत. गेल्या वर्षी प्रभासने रावण दहन केले होते. आमच्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलेने रावण दहन केले आहे". 

कंगनाने रावण दहन करणार असल्याची माहिती एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली होती. अभिनेत्री म्हणाली होती,"नमस्कार मित्रांनो, 24 ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर होणाऱ्या रामलीलामध्ये मी सहभागी होण्यासाठी येत आहे, मी रावणाचे दहनही करणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी या रामलीलेत सहभागी व्हा". 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group