उर्वशीला मिळालं लोकसभेच तिकीट, राजकारणात करणार एन्ट्री ?
उर्वशीला मिळालं लोकसभेच तिकीट, राजकारणात करणार एन्ट्री ?
img
Dipali Ghadwaje
सध्या लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये अनेक कलाकारांच्या उमेदवारीच्या चर्चा फार जोर धरु लागल्या आहेत. अभिनेत्री कंगणा राणौत, अक्षय कुमार , माधुरी दीक्षित या सगळ्या कलाकारांची नावं या यादीमध्ये आहे. पण या सगळ्यात एका अभिनेत्री तिला लोकसभेचं तिकीट मिळालं असल्याचं थेट जाहीरच करुन टाकलं आहे. उर्वशी रौतेला हीने तिला लोकसभेचं तिकीट मिळालं असल्याचं सांगितलं आहे. 

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरते. त्यातच आता नुकतच राजकारणातील एन्ट्रीवर उर्वशीने केलेल्या एका कमेंट्सने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीनं म्हटलं की, मला एका पक्षाकडून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. पण राजकारणात एन्ट्री करायची की नाही हे अद्याप माझं ठरलेलं नाहीये. तसेच तिने तिच्या राजकारणातील एन्ट्रीवर तिच्या चाहत्यांना देखील कमेंट्स करुन यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं आहे. 
 
उर्वशीच्या या वक्तव्यानंतर तिच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगू लागलीये. पण इतकं सगळं असलं तरीही राजकारणात एन्ट्री करायची की नाही हे मात्र उर्वशीचं अजूनही ठरलं नाहीये. त्यामुळे तिच्या या वक्तव्यामुळे उर्वशी सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. त्यातच उर्वशीला कोणत्या पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, याची देखील उत्सुकचा सर्वांना लागून राहिलीये. त्यामुळे आता उर्वशी राजकारणात एन्ट्री करणार का आणि केली तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये लागून राहिली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group