काही दिवसांआधीच सलमान खान त्याचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यासोबत 'अँग्री यंग मॅन'च्या ट्रेलर लॉन्च वेळी दिसले. यावेळी त्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना भ्रष्ट म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या लोकांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. जया बच्चन या आपल्या बेताल वक्तव्यांमुळे आणि रागामुळे नेहमी चर्चेत असतात. सलीम शेख आणि जावेद अख्तर यांच्या जोडीबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं.
जया बच्चन यांनी जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जोडीबद्दल असे काही बोलले होते त्यामुळे सलमान खान देखील चिडला होता. त्याने त्यांना आपल्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले होते. 'अँग्री यंग मॅन' च्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानने नाव न घेता आपली नाराजी व्यक्त करत असे बोलणारे वेडे होते, असे म्हटले आहे. चाहत्यांना देखील सलमान खानची ही वृत्ती आवडली आहे.
काही वर्षांपूर्वी जया बच्चन यांनी जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जोडीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यावर आता सलमान खानने राग व्यक्त केलाय. अँग्री यंग मॅन या माहितीपटात जया बच्चन यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आलाय. ज्यात त्या सलीम आणि जावेदला असभ्य म्हणाल्या होत्या.
यावर नाव न घेता नाराजी व्यक्त करत सलमान खानने ‘काही लोक पूर्णपणे वेडे आहेत.’ अशी प्रतिक्रिया दिली. अभिनेता म्हणाला, “ज्या कारणांमुळे लोक त्याच्या वडिलांसोबत काम करू शकले नाहीत. मग ते तारखांचा अभाव असो किंवा त्यांना कथानक आवडलं नाही किंवा त्यांना त्यांची भूमिका आणि पात्र आवडलं नाही. यामागे काही कारण असू शकतं.”