'त्या' जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना जॉन अब्राहमने सुनावलं ; म्हणाला, “तुम्ही मृत्यू विकताय”
'त्या' जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना जॉन अब्राहमने सुनावलं ; म्हणाला, “तुम्ही मृत्यू विकताय”
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. केव्हा अभिनयामुळे तर केव्हा जाहिरातींमुळे ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. जाहिरातीतून अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर कमवत असतात.

अनेक सेलिब्रिटी गुटखा आणि पान मसाल्याचीही जाहिरात करताना आपण पाहिले असतील. आता त्या सर्व सेलिब्रिटींवर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने सडकून टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगणने एका पान मसाल्याच्या जाहिरातीत एकत्र काम केले आहे. या जाहिरातीत काम करणाऱ्या सेलिब्रिटींवर अभिनेता जॉन अब्राहमने सडकून टीका केली आहे.

सध्या जॉन अब्राहम 'वेधा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे.

जॉन अब्राहम मुलाखती दरम्यान म्हणाला की, "मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगलो आणि मी जसं सांगतो तसं आचरणात आणलं तर मी एक आदर्श व्यक्ती ठरेल. पण मी लोकांसमोर वेगळं रुप दाखवत असेल आणि मी खऱ्या आयुष्यात खूप वेगळा वागत असेल तर लोकं मला लगेचच ओळखतील. जे लोकं फिटनेसविषयी बोलतात तेच लोक पान मसाल्याची जाहिरात करतात. पान मसाल्याची जाहिरात करणारे लोकं माझे मित्रच आहेत. मी त्यांच्यावर कायमच प्रेम करतो. मी केव्हाच कोणाचा अनादर करत नाही."

पुढे मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "मी इथे स्पष्ट करू इच्छितो की, मी इथे माझ्या स्वत:बद्दल बोलत आहे. मी केव्हाच लोकांना चुकीच्या गोष्टी विकणार नाही. वर्षाकाठी पान मसाला इंडस्ट्री ४५,००० कोटींचूी उलाढाल करते, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का ? याचा अर्थ असा की, सरकार सुद्धा पान मसाल्याला सपोर्ट करतो. त्यामुळेच ते बेकायदेशीर नाही. पण तुम्ही मृत्यू विकताय. तुम्ही कसे जगू शकता?" 

अक्षय कुमार, शाहरूख खान आणि अजय देवगण यांनी जाहिरात केली होती. त्यावेळी त्यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर अक्षयने त्या जाहिरातीतून काढता पाय घेत चाहत्यांची माफी मागितली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group